गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

मराठी विकिपीडिया सुधार कार्यक्रम

मराठी विकिपीडिया सध्या काही नाती गाती जपणार्र्या लोकांच्या ताब्यात आहे. नात्या गोत्यात नासानार्र्या विकी सदस्यांना तेथून हुसकावून  लावले जाते.

मराठी विकिपीडिया वरील अनागोंदी कारभाराला वाचां फोडण्यासाठी मी हा ब्लॉग आज पासून सुरू करत आहे.

मराठी विकी वर नात्या गोत्यात नसनार्याचा आवाज दाबण्यासाठी अनेक तंत्राचा वापर होतो , त्यातील एक प्रकार म्हणजे आय.पी. ब्यान करणे.  ज्या मुळे सदस्य विकिवर लिहुच शकत नाही. असा प्रकार नात्या गोत्यातल्या लोका बद्दल होत नाही , ज्याचे ताजे उदाहरण म्हणजे आज (२६/९/२०१२)  कहर  करणारा सदस्य Zadazadti ला केवळ तंबी देण्यात आली. सदस्य Zadazadti म्हणजे एक प्रशासक ह्या तोतया नावाने गोंधळ घालतो.

एवढेच नाहीतर मराठी विकिवर दुसर्या क्रमाकाचे योगदान असणार्र्या पण नात्या गोत्यात नसलेल्या एका सदस्याला ह्या लोकांनी कुटील कारस्थान करून हाकलून लावले.

ह्या ब्लोग वर अश्य्या कुटील कारस्थानी लोकांची माहिती, घटनांची माहिती तसेच मराठी विकिपीडिया नात्या गोत्यातून बाहेर काढुन खरोखरच मुक्त ज्ञानकोश बनवण्या बद्दल चर्चा करेल.

ह्या शिवाय जिमी  वेल्स तसेच इतर विकी पदाधिकार्यां पर्यंत हा आवाज पोहचवण्याचा प्रयत्न करेन (मुख्यत्वे इमेल इ.).