मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

नवीन अध्याय

विकि वर संपादन करणारया इतर सदस्या सोबत चर्चे अंती, मला असे जानवले मराठी विकिला सर्वसमावेशक  बनवण्यासाठी नात्या गोत्यात नसणारी सदस्य प्रचालक होणे आवश्यक आहे. प्रचालक असा व्यक्ती पाहिजे ज्याला स्वताचे मत, विचार असतील.

मला ज्यांचे विचार पटत नाहीत, पण ज्यांच्या कडे स्वताचे विचार आहेत असे सदस्य  भीमरावमहावीरजोशीपाटील यांना प्रचालक करण्यासाठीचा प्रस्थाव आम्ही विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे मांडला आहे.

महत्वाचा मुद्दा आम्ही केवळ एकाच मत आमच्या गटा कडून देणार, ज्यामुळे आमच्यात व सद्य प्रचालक गटातील विचारांचा फरक सर्वां समोर येईल, खर पहाता आमची सद्य मोहीम अश्या विचारां / प्रवृत्ति  विरुध्दच आहे.

आमचा विकी वरील प्रस्थाव खाली दिलेला आहे.



सर्व समावेशकत्वाचा अभाव असलेल्या मराठी विकिपीडियाला सर्वांचा समावेश असलेला ज्ञानकोश बनवण्यासाठी तसेच सर्व समावेशकत्वाचा विचार करणारी प्रचालकांची नवी पिढी तयार करण्यासाठी नात्या गोत्यात न गुंतलेल्या व स्वतंत्र विचार असणाऱ्या प्रचालकांची आवश्यकता मराठी विकिपीडियाला आहे.

वरिल कारणांमुळे मी [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] यांचे नाव प्रचालक पदासाठी सुचवत आहे. आपले समर्थन देउन मराठी विकि  सर्व समावेशक करण्यासाठी ह्या पहिल्या पावलात आपण योगदान द्यावे हि नम्र विनंती.



  

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ